Pune Crime | गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | हडपसर येथे सुमारे तीन किलो ५०० ग्रॅम गांजा बेकायदा बाळगल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राणी पिराजी सूर्यवंशी (वय ३०, रा. हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. तिच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

तिच्याकडून ३५ हजार रुपये किमतीच्या गांजासह २१ हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, तिच्याविरोधात यापूर्वी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने गांजा कोणाकडून आणला, कोणाला विकला, याचा शोध घेण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव (Assistant Public Prosecutor Vijay Singh Jadhav) यांनी केली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | विमानतळ, कोंढवा, हडपसरमधील 12 अवैध धंद्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 11 गुन्हयात 2 लाख 7 हजाराचा माल जप्त

7th Pay Commission | 31 टक्के DA झाल्यास सॅलरीत होईल जबरदस्त वाढ, जाणून घ्या गणित

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यापाठोपाठ चिंचवडमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना, पीडित मुलगी अल्पवयीन

BJP Vs Shivsena | शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची’ (VIDEO)

Pune News | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला