Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राहात असलेली खोली सोडून निघून जावे यासाठी एका महिलेला वारंवार त्रास देऊन मारहाण (Beating) करण्यात आली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूला जबाबदार (Pune Crime) असणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध वारजे माळवाडी (Warje Malwadi Police) पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 25 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्वेनगर (Karvenagar) येथील हिंगणे होम कॉलनीत (Hingane Home Colony) घडला आहे.

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

लता श्रीकांत माने Lata Srikant Mane (वय-47 रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वृशाली तानाजी बोडके (Vrishali Tanaji Bodke), तानाजी बोडके Tanaji Bodke (रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोनिया जयेश ओव्हाळ Sonia Jayesh Oval (वय-32 रा. राजेंद्र नगर, विवेकश्री बिल्डींग, नवी पेठ) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) मंगळवारी (दि.29) फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लता माने आणि फिर्यादी सोनिया ओव्हाळ हे एकमेकींच्या ओळखीचे आहेत. लता माने यांनी आरोपी तानाजी बोडके यांच्या वडिलांकडून एक खोली विकत घेतली आहे. त्या खोलीत लता या राहात होत्या. आरोपींनी लता माने राहत असलेली खोली सोडून जावे यासाठी वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली.

शुक्रवारी (दि.25) सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपींनी लता माने यांना खोली सोडून जाण्यावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली.
आरोपींनी कोणत्यातरी कठीण वस्तूने लता माने यांच्या शरीरावर, हातापायावर डोक्यात मारहाण केली.
यामुळे माने यांना मुक्का मार लागला. यामध्ये गंभीर जखमी (Seriously Injured) झालेल्या लता माने यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूला आरोपी जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार पोलिसांनी दोघांवर IPC 304/2,504,506,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रायकर (API Raiker) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Woman beaten to death! Husband and wife responsible for death filed a case at Warje Malwadi Police Station, Incident at Hingane Home Colony, Karvenagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी ! DA मध्ये भरघोस वाढ, कॅबिनेटमध्ये झाली घोषणा

 

How To Control Blood Sugar | ब्लड शुगर लेव्हल करायची असेल कंट्रोल तर ‘या’ Fruits चे करा सेवन; जाणून घ्या

 

Urvashi Rautela Superhot Photo | उर्वशी रौतेलानं डीप नेकचा ड्रेस घालून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हायरल फोटो