Pune Crime | परदेशात नोकरीच्या आमिषाने महिलेने 10 जणांना फसवलं, समर्थ पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलंड येथे वर्क परमिट प्राप्त करुन देऊन नोकरी लावण्याचा आमिष दाखवून (Lure Of Job) एका महिलेने ९ ते १० जणांची १० लाख ५५ हजारांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी नाना पेठेतील (Nana Peth, Pune) एका ३१ वर्षाच्या तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३८/२२) दिली आहे. हा प्रकार २८ मे २०२१ ते २८ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे. (Fraud Case)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेटवर परदेशात नोकरीच्या संधी शोधत होते.
त्यावेळी मयुरी श्रीवास्तव या तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधला व पोलंड या देशात वर्क परमिट प्राप्त करुन
नोकरी लावण्याचे आश्वासन दिले (Pune Crime).
वर्क परमिटच्या बिझनेसमध्ये सामील लोण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी व
इतर ९ ते १० जणांकडून वेळोवेळी १० लाख ५५ हजार ७९१ रुपये घेतले.
त्यांना कोणालाही नोकरी न लावता तसेच व्हिसा न देता खोटे अ‍ॅग्रीमेंट तयार करुन त्यांना पाठविले व
त्यांची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साठे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman cheated 10 people with the lure of job abroad, FIR in Samarth police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात घरातून प्रोत्साहन दिले पाहिजे – दिलीप वळसे पाटील

 

Builder Mangal Prabhat Lodha | बांधकाम व्यावसायिक शिंदे सरकारचे बनले मंत्री

 

Pune Crime | ७ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; चिमुरडीने युक्तीने करुन घेतली स्वत:ची सुटका