Pune Crime | महिलेने 73 वर्षाच्या ज्येष्ठाकडे मागितली 20 लाखांची खंडणी; विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तुमच्यामुळे आमच्यामध्ये घटस्फोट (Divorce) झाला. बायकोने आत्महत्या (Suicide In Pune) केली असल्याची धमकी (Threat) देऊन एका दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकाकडे 20 लाखांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी कर्वेनगर (Karvenagar) येथे राहणार्या ७३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने (Senior Citizens) विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित शिंदे Amit Shinde (वय ३८) आणि स्रेहल शिंदे ऊर्फ आमरोळे Srehal Shinde alias Amrole (वय ३२) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) ६ जुलै ते २६ जुलै दरम्यान घडला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्वेनगर येथे रहातात. त्यांच्याकडे आरोपी कामाला होते.
आरोपींनी फिर्यादी यांना तुमच्यामुळे आमच्या घटस्फोट झाला अशी धमकी देऊन त्यांच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली.
नाही तर आत्महत्या करेल, अशी स्रेहल शिंदे हिने धमकी दिली. त्याकडे फिर्यादी यांनी दुर्लक्ष केले.
त्यानंतर काही दिवसांनी अमित शिंदे हा त्यांच्याकडे गेला. स्रेहल शिंदे हिने आत्महत्या केली असल्याचे खोटे सांगितले.
तुमच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल केला असल्याचे खोटे सांगितले.
या गुन्ह्यांतून नाव कमी करण्यासाठी त्यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर फोन करुन ६ लाख रुपयांची मागणी केली आहे. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक बरुरे (PSI Barure) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Woman demands ransom of 20 lakhs from 73 year old man; Crime in Vishrambaug Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shivsena | ‘नारायण राणे भाजपच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतात’, शिवसेनेची टीका
Supreme Court On PMLA Act | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PMLA अंतर्गत कारवाईच्या हस्तक्षेपास नकार