Pune Crime | रस्ता ओलांडताना PMPML बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, बस चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्ता ओलांडत असताना एक ज्येष्ठ महिला पीएमपीएमएल (PMPML) बसच्या मागील चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुण्यातील (Pune Crime ) विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात (Mukundrao Ambedkar Chowk Vishrantwadi) बुधवारी (दि.9) दुपारी पावणे चारच्या सुमारास झाला. पदमा पंढरीनाथ गायकवाड Padma Pandharinath Gaikwad (वय-75 रा. गोल्डक्राफ्ट हाऊसिंग सोसायटी, चव्हाण चाळ, विश्रांतवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे.

याप्रकर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) बस चालकाविरुद्ध (Bus Driver)  गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पदमा गायकवाड या बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे (Bhosari) जाणारी (एमएच 12 आरएन 7103) या बसच्या चाकाखाली आल्याने त्या काही अंतर फरपटत गेल्या.(Pune Crime)

यामध्ये चाकाखाली चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठवला.
बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | woman died after falling under the wheel of a bus while crossing the road in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stocks | दोन महिन्यात पैसे डबल, ‘या’ टेक्सटाईल स्टॉकने केले मालामाल !

 

Sara Sachin Tendulkar | लंडनला परतली सारा तेंडुलकर, पोस्ट केले खास छायाचित्रं

 

Lata Mangeshkar Memorial | लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्क येथे नाही तर ‘या’ ठिकाणी होणार, राज्य सरकारने केली घोषणा