Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरात डोक्यात वीट पडून महिलेचा मृत्यु

पुणे : Pune Crime | सुरक्षेच्या साधनांचा वापर न करता मजूरांकडून अनेक ठिकाणी काम करुन घेतले जाते़ त्यातून काही वेळा जीवघेणा प्रकार घडतो़ बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना हेल्मेट देणे बंधनकारक असतानाही ते न दिल्याने डोक्यात वीट पडल्याने जखमी होऊन त्यात एका महिलेचा (Pune Crime) मृत्यु झाला.

अंजूबाई नारायण पवार (रा. समर्थ अपार्टमेंट, संतोषनगर, कात्रज) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण शिवा पवार Narayan Shiva Pawar (रा. सच्चाई माता मंदिर पाण्याचे टाकीजवळ, कात्रज) या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. हा प्रकार मुंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला.

कात्रज येथील संतोषनगरमधील (Santosh Nagar Katraj) समर्थ अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. इमारतीचे वीट व प्लास्टर बांधकामाचे नारायण पवार याला ठेका देण्यात आला आहे. त्याने बांधकामाच्या ठिकाणी मजूरांना हेल्मेट पुरविले नाही. तसेच सरंक्षण जाळी बसविली नाही. वरच्या मजल्यावर साहित्य घेऊन जाणार्‍या बकेटमधून वीटा पोहचविल्या जात होत्या. या बकेटमधून एक वीट खाली पडली. ती नेमकी अंजूबाई पवार यांच्या डोक्यात पडली. डोक्यात हेल्मेट नसल्याने त्यांना वर्मी घाव बसून त्यात त्यांचा मृत्यु झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (senior police inspector jagannath kalaskar) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिला पोलिसाचा ‘विनयभंग’; जाणून घ्या प्रकरण

Virginity | ‘व्हर्जिनिटी’ (कौमार्य) गमावण्याला दिले गेले नवीन नाव, जगात सुरू झाली ‘चर्चा’ !

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Woman dies after falling head over heels in Katraj area of ​​Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update