Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला पेट्रोल टाकून पेटवलं, दोघांचाही मृत्यू

पुणे / येरवडा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने (Employee) मालकिणीला (Woman Employer) पेट्रोल ओतून जाळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथे हा प्रकार घडला असून या घटनेत मालकिणीसह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे (Pune Crime). बाला जॉनी Bala Johnny (वय-32) आणि मिलिंद नाथसागर Milind Nathsagar (वय-35) असे मृत्यू (Death) झालेल्या दोघांची नावे आहेत. (Woman Employer Set On Fire By Dismissed Employee, Both Die During Treatment In Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, बाला जॉनी यांचे वडगाव शेरी येथील रामचंद्र सभागृह (Ramchandra Hall) येथे ए टू झेड टेलरिंगचे दुकान (A to Z Tailoring Shop) आहे. या दुकानात मिलिंद हा मागील दोन वर्षापासून काम करत होता. मागील आठवड्यात बाला यांनी मिलिंद याला कामावरुन काढून टाकले होते. कामावरुन काढल्याचा राग मिलिंद याच्या डोक्यात होता. याच रागातून त्याने बाला यांच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून त्यांना पेटवून दिले. या घटनेत बाला आणि मिलिंद हे दोघे गंभीर जखमी झाले होते. (Pune Crime)

स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मिलिंद याचा पहाटे पाच वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाला हिचा सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला. बाला ही मुळची ओडिशा (Odisha) राज्यातील असून मागील दहा वर्षापासून वडगाव परिसरात टेरलरिंगचा व्यवसाय करत होती. बाला ही पतीपासून विभक्त राहत होती. तिचा घटस्फोट (Divorce) झाला असून तिला दाहा वर्षाचा एक मुलगा आहे. तर आरोपी मिलिंद हा मुळचा परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) असून तो दोन वर्षापासून बाला यांच्याकडे कामाला होता.

सोमवारी रात्री कामावरून काढल्याच्या रागातून ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) मयत मिलिंद नाथसागर याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वाचवण्यासाठी गेलेला प्रशांत कुमार (Prashant Kumar) नावाचा मुलगा देखील भाजला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच साहयक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव (Senior Police Inspector Sunil Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील थोपटे (Police Inspector Sunil Thopte), महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड (PSI Swapnali Gaikwad) यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक शिसाळ (PSI Vivek Shisal)हे करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Woman Employer Set On Fire By Dismissed Employee,
Both Die During Treatment In Wadgaon Sheri Of Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FI