Pune Crime | महिलेचे इंजिनियर तरुणावर जडलं प्रेम, पतीला घटस्फोट दिल्यानंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार; महिलेच्या तक्रारीवरुन प्रियकर गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सरकारी नोकरी (Government Jobs) असलेला पती व दोन मुलं असलेली महिला एका इंजिनिअरच्या (Engineer) प्रेमात पडली. त्याने महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यासोबत शरीर संबंध (Physical Relationship) ठेवले. एवढेच नाही तर महिलेने त्याच्यासोबत राहण्यासाठी पतीला घटस्फोट (Divorce) दिला. मात्र, प्रियकर इंजिनियरने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. पीडित महिलेने आरोपी प्रियकरावर चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध IPC 376 (एन) 417 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Police) महिलेच्या तक्रारीवरुन इंजिनियर कुणाल शिवाजी निकम (Kunal Shivaji Nikam) याला अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.

 

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने रविवारी (दि.10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन कुणाल निकम (वय – 27 रा. नवीन घरकुल, चिखली) याला अटक केली आहे. हा प्रकार जुलै 2019 ते 16 मार्च 2022 या कालावधीत महिलेच्या घरी व दिघी (Dighi) येथे घडला आहे. महिलेने पतीला घटस्फोट देताना पती आणि तिच्या वयामध्ये 15 वर्षांचे अंतर असल्याचे कारण सांगितले.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल निकम हा मेकॅनिकल इंजिनियर (Mechanical Engineer) आहे. सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive) म्हणून तो नोकरी करतो. कामाच्या ठिकाणी त्याची फिर्यादी महिलेसोबत ओळख झाली. महिलेचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. आरोपीने ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घे, मी तुझ्या सोबत लग्न करतो व तुला सांभाळतो, तुला सुखात ठेवतो’ अशी खोटी आश्वासने दिली.

 

फिर्यादी महिलेने त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवला.
आरोपीने महिलेला विश्वासात घेऊन तिच्या राहत्या घरी व दिघी येथील लॉजमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.
आरोपीवर विश्वास ठेवून महिलेने पतीसोबत घटस्फोट घेतला.
मात्र आरोपीने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला.
फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने आरोपी कुणाल निकम याच्या विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर (PSI Vivek Kumatkar) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | woman gave divorce to husband but engineer freind refused to marry her rape case pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा