Pune Crime | पुण्यात मांजरीचा मर्डर ! पोस्टमार्टमनंतर शेजारील महिलेवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये मांजरीच्या मृत्यू प्रकरणी (Cat Murder In Pune ) एका महिलेवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर (Gokhale Nagar) परिसरात 2 एप्रिल रोजी ही घटना घडली असून प्रशांत दत्तात्रय गाठे (Prashant Dattatraya Gathe) (वय, 53) यांनी याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली. यावरून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याच्या अधिनियमानुसार शिल्पा नीलकंठ शिर्के (Shilpa Neelkanth Shirke) (रा. शिर्के पिठाच्या गिरणीशेजारी, गोखलेनगर) या महिलेवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. (Woman Kills Kitten For Making Loud Noise, FIR Registered In Chaturshringi Police Station Of Pune)

 

याबाबत माहिती अशी की, गाठे यांच्या घरात 3 ते 4 महिने वयाचे मांजरीचे पिल्लू होते. गुढीपाडव्याच्या दिवशी फिर्यादीची पत्नी घराबाहेर रांगोळी काढत होती त्यामुळे दरवाजा उघडा होता. दरवाजातून ते मांजरीचे पिल्लू घराबाहेर पडले आणि थेट शेजारच्या घरात गेले. त्यानंतर काही वेळातच शिल्पा शिर्के या महिलेने हे पिल्लू असं का करते म्हणून शेजा-याला माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी घरात जाऊन पाहिले असता मांजरीचे पिल्लू तडफडत होते. त्यानंतर काही वेळातच त्याने प्राण सोडले. (Pune Crime)

 

यानंतर फिर्यादी यांनी मांजरीच्या पिल्लाचे पोस्टमार्टम (Postmortem) केले. त्यानंतर डोक्यात वर्मी वार बसल्याने त्याचा मृत्यू (Died) झाल्याचे पोस्टमार्टममध्ये समोर आले. त्याच्यानंतर शेजारील महिलेवर हातातील काठीने मांजराच्या डोक्यावर मारून त्याला ठार मारल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-  Pune Crime | Woman Kills Kitten For Making Loud Noise FIR Registered In Chaturshringi Police Station Of Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा