Pune Crime | फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फायनान्स कंपन्यांकडून (Finance Companies) वसुलीसाठी लोकांचा वापर करुन लोकांना मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने वाहने ओढून घेऊन जात असल्याच्या तक्रारी (Pune Crime) वारंवार येत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे आरोप होत असतानाच महिलेचा विनयभंग (Molestation) करुन तिच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन रिक्षा जबरदस्तीने ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. 9 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा दखल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी घेऊन आता केवळ गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

मुंढवा पोलिसांनी फायनान्स कंपनीचे (Finance Company) पिटर मोरे (Peter More) आणि सॅम अशा दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी घोरपडीगावातील एका 32 वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa police station) फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या पतीने रिक्षासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते थकल्याने 9 डिसेंबर रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फायनान्सचे लोक त्यांच्या घरी आले होते. ते रिक्षा ओढून घेऊन जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी रिक्षा घेऊन जाऊ नका, असे सांगत असताना त्यातील एकाने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. फिर्यादी यांना बुरख्यासह त्याच्याजवळ ओढून घेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन करुन विनयभंग केला. फिर्यादीच्या पतीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पतीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटून तो फोडला.

 

 

फिर्यादीचे पतीने रिक्षाची चावी दिली नाही म्हणून या गुंडांनी रिक्षाचे हॅन्डल लॉक (Rickshaw Handle Lock)
दगडाने तोडून रिक्षामधील रोख रक्कम, लायसन्स, रिक्षाचे बॅचसह रिक्षा ओढून घेऊन गेले.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) तक्रार दिली होती.
बंडगार्डन पोलिसांनी ती मुंढवा पोलिसांकडे पाठविली. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक माने (API Mane) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Woman molested by people from finance company

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | चिंताजनक राज्यात आज ओमिक्रॉनचे नवे 50 रूग्ण, पुण्यात सर्वाधिक 36

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 175 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 11,877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी

Skin Care Tips | चेहरा साफ करताना अनेकदा लोक करतात या 5 चुका , त्वचेसाठी नुकसानदायक