Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुणे : Pune Crime | घरी आलेल्या तरुणाने खाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार (Rape) केला़ त्यावेळचे शारीरीक संबंधाचे फोटो काढून ते पतीला दाखविण्याचा भिती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) सौरभ संतोष श्रीवास्तव Saurabh Santosh Srivastava (वय २९, रा. गोरखपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. या तरुणाने औंध (Aundh) येथे बुधवारी फिर्यादी महिलेचा टीशर्ट सार्वजनिक जागेत फाडून मारहाण केली. या कृत्यामुळे तिने आपल्यावर गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना विशद केली.

ही महिला २६ एप्रिल २०२० रोजी घरी असताना सौरभ श्रीवास्तव हा मांरुजी येथील घरी आला होता. त्याने खाण्यातून कोणतेतरी गुंगीकारक पदार्थ फिर्यादी यांना दिला. त्यामुळे फिर्यादी यांची शुद्ध हरपली. त्यानंतर सौरभ याने त्यांच्यावर बलात्कार केला. त्यांचे विवस्त्र फोटो काढले. हे फोटो तुझ्या पतीला पाठवितो, असे फिर्यादी यांना सतत धमकावून त्यांच्यावर तेव्हापासून १४ जून २०२१पर्यंत वारंवार अत्याचार केला. तसेच त्यांच्या खात्यातून जबरदस्तीने ४४ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन अपहार केला. बुधवारी त्याने भर रस्त्यात फिर्यादी यांचा टीशर्ट फाडून त्यांना मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिला पोलिसाचा ‘विनयभंग’; जाणून घ्या प्रकरण

Virginity | ‘व्हर्जिनिटी’ (कौमार्य) गमावण्याला दिले गेले नवीन नाव, जगात सुरू झाली ‘चर्चा’ !

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Woman raped in Pune Threats to make naked photos of physical relations viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update