Pune Crime | पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याप्रकरणात महिलेचा जामीन फेटाळला, शेतातून भोपळे चोरल्याची तक्रार केल्यास अ‍ॅट्रॉसिटी लावण्यासह…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | शेतातून भोपळे चोरल्याची तक्रार केल्यास अ‍ॅट्रॉसिटी लावण्यासह जीवे मारण्याची धमकी देत पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याप्रकरणात एका महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मोक्का न्यायाधीश जी. पी. अगरवाल (Mcoca Judge G. P. Agarwal) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.

चांदणी अक्षय उर्फ आकाश काळे (वय २५, रा. दिपनगर, काटेवाडी, ता. बारामती) असे तिचे नाव आहे.
११ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बारामतीमधील झारगडवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणात आत्तापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
तर, एकजण अद्याप फरार आहे. घटनेच्या दिवशी सर्व आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले.
त्यानंतर, शिवीगाळ करत आमच्या विरुध्द शेतातील भोपळे चोरले म्हणुन तक्रार देणार आहे का? असे म्हणत तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत एकाने छातीवर पिस्तुल रोखली.
त्यानंतर, अन्य आरोपींनी लाथाबुक्कांनी मारहाण करत घरातील पिशवी व कपाटातील पैसे नेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर (Lawyer Pramod Bombatkar) यांनी विरोध केला.

 

Web Title : Pune Crime | Woman’s bail rejected in pistol robbery case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यात विविध ठिकाणी नोकरी महोत्सव आयोजित करू : पुणे मनपाचे सभागृह नेते गणेश बिडकर

Supreme Court | ‘सुप्रीम कोर्टा’ने केंद्राला सुनावले; म्हणाले – ‘कोरोना मृतांच्या वारसांना मदत कधी देणार?’

National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या