Pune Crime | डॉक्टरकडून 4 लाखाची खंडणी घेताना पत्रकारासह महिला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चुकीचे उपचार केल्यामुळे गावठी श्वान (DOG) मेला असल्याचे सांगून नुकसान भरपाई म्हणून डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणी मागून (Demanded Extortion) 4 लाख रुपये घेताना पत्रकारासह (Journalist) एका महिलेला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell) बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये सापळा रचून केली आहे. (Pune Crime)

 

नूतन राजेश पारखे (टोळगे) Nutan Rajesh Parkhe (वय- 47 रा. कसबा पेठ पोलीस चौकीजवळ, पुणे), पत्रकार संदीप थकाजी शिंगोटे Journalist Sandeep Thakaji Shingote (वय-38 रा. वडगाव शेरी, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अनोळखी व्यक्तीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) आयपीसी 384, 385, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. अशोक कृष्णा भोंडवे Dr. Ashok Krishna Bhondve (रा रहाटणी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

आरोपी नूतन पारखे यांनी गावठी श्वान डॉ. भोंडवे यांच्याकडे उपचारासाठी नेला होता. परंतु चुकीच्या उपचारामुळे श्वान मेल्याचा आरोप करत नूतन आणि संदीप यांनी डॉक्टरांकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच तुमच्या घरावर महिलांचा मोर्चा घेऊन येईल. जर तुम्ही पैसे दिले नाही तर दवाखाना आणि घर जाळुन टाकण्याची धमकी डॉक्टर भोंडवे यांना दिली. याबाबत डॉक्टरांनी तक्रार अर्ज केला होता.

या तक्रार अर्जाची चौकशी खंडणी विरोधी पथक एकने केली असता आरोपींनी डॉक्टरांकडे पाच लाख रुपये खंडणी मागून तडजोडी अंती चार लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी तक्रारदार डॉक्टर यांना चार लाख रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये (Collector’s Office Canteen) बोलावले.
खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून खंडणीची चार लाख रुपये रक्कम घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.
पुढील तपास खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijit Patil), पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
महिला पोलीस अंमलदार हेमा ढेबे, संजय भापकर, रविंद्र फुलपगारे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, गंगावणे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Women in crime branch’s net with journalist while extorting 4 lakhs from doctor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!