Pune Crime | साडीवाटपाच्या बहाण्याने महिलेचे दागिने लंपास; लाल महल चौकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिलांना मोफत साडी वाटप केली जात असल्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ महिलेचे पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) चोरट्यांनी लंपास केले. ही घटना (Pune Crime) बुधवारी (दि.7) पुण्यातील लाल महल चौकातील (Lal Mahal Chowk) दत्त मंदिरात दुपारी तीनच्या परिसरात घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत बुधवार चौकात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध आयपीसी 379, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दत्त जयंती (Dutt Jayanti) असल्याने फिर्यादी ज्येष्ठ महिला लाल महल चौकातील दत्त मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी दोन जणांनी त्यांना अडवले व आमचे शेठ गरीब महिलांना साडीवाटप करत असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले.
महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी पिशवीतील 2 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.
काही वेळानंतर महिलेने पिशवीत पाहिले असता, दागिने दिसले नाहीत.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Women’s jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा