Pune Crime | दुसर्‍या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु; बी टी कवडे रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड (Plywood) कटावणीने काढत असताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु (Worker Death ) झाला. (Pune Crime)

 

संदीप रामकिशन कुमार Sandeep Ramkishan Kumar (वय २८, रा. निगडेनगर, घोरपडी) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना बी टी कवडे रोडवरील निगडेनगर येथे गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.

 

याप्रकरणी आदित्य रामकिशन कुमार Aditya Ramkishan Kumar (वय २२, रा. उत्तर प्रदेश) यांनी मुंढवा पोलिसांकडे (Mundhwa Police) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार सुरेश तुळशीराम कसबे Suresh Tulshiram Kasbe (रा. गोपाळपट्टी, टकलेनगर कॉलनी, मांजरी बु़) आणि इमारतीचे मालक रघु माणिक्कम जाधव Raghu Manikkam Jadhav (रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघु जाधव यांच्या मालकीच्या इमारतीचे काम ठेकेदार सुरेश कसबे हे करीत आहेत. संदीप कुमार हा दुसर्‍या मजल्यावरुन पहिल्या मजल्याच्या स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड कटावणीने काढून घेत होता.
हे काम करताना त्याला सेफ्टीबेल्ट, हेल्मेट तसेच संरक्षक जाळी असे कोणतेही साहित्य पुरविण्यात आले नाही.
त्याकडून धोकादायकरित्या काम करवून घेत असताना तो दुसर्‍या मजल्यावरुन खाली पडून त्याचा मृत्यु झाला.
पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Worker dies after falling from second floor; Incident on BT Kawade Road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा