Pune Crime | येरवड्यातील गुंडाला MPDA कायद्यान्वये केले औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा (Yerwada) परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुंडावर (Pune Criminal) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई केली असून त्याला १ वर्षासाठी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात (Aurangabad Central Jail) स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला आहे. (Pune Crime)

 

निहाल विशाल भाट Nihal Vishal Bhat (वय २३, रा. भाटनगर, येरवडा) असे या गुंडाचे नाव आहे. त्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) लोखंडी कोयत्यासारखे हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, अपहरण विनयभंग (Molestation), दुखापत व बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Crime)

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam) व पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakra) व पी सीबी विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी प्रस्ताव तयार केला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन
भाट याला एक वर्षाकरीता औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत ७३ गुन्हेगारांना एम पी डी ए अन्वये स्थानबद्ध केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Yerwada goon booked under MPDA Act in Aurangabad Jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा