Pune Crime | येरवड्यातील गणेशनगरमधील ज्येष्ठ महिलेस साडीचा मोह पडला महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका बड्या व्यापार्‍यास मुलगा झाला आहे. तो साडी व पैसे भेट देणार असल्याचे सांगणार्‍या दोघा चोरट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला हा मोह चांगलाच महागात पडला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत (Pune Crime) लांबविली.

याप्रकरणी येरवड्यातील गणेशनगरमध्ये (Ganesh Nagar, Yerwada) राहणार्‍या ६२ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चित्रा टॉकीज चौकातून जात होत्या. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांना बड्या व्यापार्‍यास मुलगा झाला आहे व तो साडी व पैसे भेट देणार आहे, असे सांगितले. त्यांना बरोबर चलण्यास सांगितले. काही अंतर गेल्यावर त्यांनी फिर्यादी यांना अंगावर सोन्याचे दागिने पाहून भेट देणार नाही, तुम्ही गळ्यातील पोत काढून पिशवीत ठेवा असे सांगितले. त्यानुसार त्यांनी गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ३० हजार रुपयांची सोन्याची पोत काढली. ती फळाचे पिशवीत ठेवत असताना त्यांना मदत करण्याचा बहाणा करुन त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने ही पोत (Pune Crime) काढून घेऊन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.

Web Titel : Pune Crime | Yerwada Police Station Ganesh Nagar area Cheating with woman

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा