Pune Crime | ‘‘तू पाकिस्तानी आहे, तुमचे व्हिडिओ कसे व्हायरल करते बघ’’; महिलेने नस कापण्याची भिती दाखवून दिली धमकी

पुणे : Pune Crime | एकाच सोसायटीत राहणार्‍या महिलेने दुसर्‍या महिलेला ‘‘तू पाकिस्तानी आहे. यांना पाकिस्तानला पाठविले पाहिजे, तुझे व तुझ्या मुलीचे अंघोळीचे व्हिडिओ कसे व्हायरल करते बघ’’ असे सांगून नस कापण्याची भिती दाखवून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी महंमदवाडी येथे राहणार्‍या एका ४५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१२/२२) दिली आहे. त्यावरुन त्याच सोसायटीत राहणार्‍या एका महिलेवर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी या एकमेकांच्या शेजारी रहायला आहेत.
आरोपी महिला दारु पिऊन आली. तिने फिर्यादी यांना “तू पाकिस्तानी आहे, तुला १० नवरे असतील,
तु इथे रॅकेट चालवते, तुमचे सर्वांचे पासपोर्ट काढून घेतले पाहिजे. यांना पाकिस्तानला पाठविले पाहिजे,
असे ती फिर्यादी व तिचे पतीस वारंवार बोलत. टेरेसवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून फिर्यादी यांना तुझे आणि
तुझ्या मुलीचे अंघोळीचे व बाथरुमला गेल्याचे व तुम्ही कपडे बदलतेवेळीचे देखील तुमचे व्हिडिओ कसे व्हायरल
करते बघ” असे म्हणून धमकी दिली. फिर्यादी व त्यांचे मुलीवर पाळत ठेवून वारंवार स्वत:ची नस कापण्याची
भिती दाखवून फिर्यादी यांच्या विरोधात पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन वारंवार फिर्यादीचे चारित्र्यावरुन अश्लिल बोलल्याने त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साठे (Police Sub-Inspector Sathe) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | “You are Pakistani, see how your videos go viral”; The woman threatened to cut the vein

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार