Pune Crime | हडपसरमध्ये तरुणाला बेसबॉलच्या स्टीकने मारहाण ! 50 हजाराची बॅग चोरून रिव्हॉल्व्हरने धमकाविण्याचा प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कार समोर दारु पित बसलेल्यांना वाट द्या असे सांगणार्‍या तरुणाला बेसबॉलच्या स्टीकने (Baseball Stick) मारहाण (Beating) करुन कारमधील 50 हजारांची बॅग चोरुन नेऊन रिव्हॉल्व्हर (Revolver) दाखवून धमकाविण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) शुभम कांबळे व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी इजाज मजिद पठाण (वय 34, रा. सिद्धीविनायक कॉलनी, सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसर येथील मगरपट्टा येथील मेगा सेंटरच्या (Mega Center Magarpatta) पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कांबळे व त्याचे तीन साथीदार हे मेगा सेंटरमधील पार्किंगमध्ये फिर्यादी यांच्या कारसमोर दारु पित बसले होते. फिर्यादी यांना जायचे असल्याने त्यांनी आरोपींना साईडला बसा असे सांगितले. याचा राग येऊन शुभम कांबळे याने शिवीगाळ करुन बेसबॉल स्टीकने त्यांना मारहाण केली. त्यांच्या कारच्या चारही बाजूच्या काचा फोडून नुकसान केले. कारमधील मागील सीटवर ठेवलेली 50 हजार रुपये असलेली बॅग चोरुन नेली. फिर्यादी यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करुन रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले. पोलीस उपनिरीक्षक पोमण (PSI Poman) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Young man beaten with baseball stick in Hadapsar Types of threatening with a revolver by stealing a bag of Rs 50,000

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा