Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आजारपणाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या (Commits Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात (Maval Taluka) ही घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाला मधुमेह (Diabetes) झाला होता. याच आजाराला कंटाळून युवकाने टोकाचे पाऊल उचलले. गणेश मनिकम (Ganesh Manikam) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव (Pune Crime) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मनिकम हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता (Missing) होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे गणेश यांनी घरातून जाताना, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करायला जात असल्याचे म्हटले होतं. मात्र त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. (Pune Crime)

गणेश यांनी घरातून जाताना दोरी नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरुन त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. आज जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Old Pune-Mumbai Highway) अमरदेवीच्या डोंगराच्या (Amardevi Mountain) पायथ्याशी गणेश यांचा मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | young man commits suicide due to diabetes shocking incident in dehu raod pimpri chinchwad pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा