Pune Crime | दिघीतील लॉजवरील धक्कादायक घटना ! 35 वर्षीय महिलेची हत्या करुन युवकाची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका लाॅजमध्ये युवकाने 35 वर्षीय महिलेचा गळा दाबून (Pune Crime) खून (Murder) केला. आणि त्यानंतर त्या युवकानं गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही धक्कादायक घटना दिघी येथे घडली आहे. प्रकाश महादेव ठोसर (Prakash Mahadev Thosar) (वय 28, रा. अजंठानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (25 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10 च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी, प्रकाश ठोसर (Prakash Mahadev Thosar) अविवाहित असून महिला विवाहित होती. तिला 1 मुलगा 1 मुलगी आहे. तर, विवाहितेचा पती एका खुन प्रकरणात 4 वर्षापासून कारागृहात आहे. प्रकाशसोबत तिचे गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी दिघीतील अथर्व लॉजवर जात असत. बुधवारी (24 नोव्हेंबर) रोजी दुपारी 3 वाजता दोघे लॉजवर आले होते. खोलीत दोघात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामध्ये प्रकाशने महिलेचा गळा दाबून खून (Murder) केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, ते दोघे गुरुवारी सकाळी 10 वाजता लॉज सोडणार होते.
परंतु,त्यांनी लॉज सोडला नाही. म्हणून लॉजचे व्यवस्थापक बाळू नवसागर (Balu Navsagar) यांनी बाहेरून आवाज दिला.
पण, आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी पोलिसांना (Police) कळवत दरवाजा उघडला असता ही घटना निदर्शनास आली.
ते दोघेही नग्नावस्थेत आढळून आले. त्यावेळी महिला बेडवर मृतावस्थेत पडली होती.
आणि प्रकाश फॅनला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

Web Title :- Pune Crime | young man committed suicide killing woman lodge dighi pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा