×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | जुन्या भांडणावरुन महिलेचा खून, पुणे जिल्ह्यातील कळसमधील घटना

Pune Crime | जुन्या भांडणावरुन महिलेचा खून, पुणे जिल्ह्यातील कळसमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जुन्या भांडणाच्या (Dispute) कारणावरुन एका महिलेला डोक्यात मारहाण (Beating) करुन खून (Murder) केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे घडली आहे. मृत महिलेचा मृतदेह ऊस व बाजरी पिकाच्या बांधावर आढळून आला आहे. याप्रकरणी एकावर वालचंद नगर पोलीस ठाण्यात (Walchand Nagar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

संगीता पांडुरंग वाघमारे Sangeeta Pandurang Waghmare (वय – 45 रा. वडजल ता. माण, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळु साठे Akshay Balu Sathe (रा. जांब, ता. इंदापुर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली (Milind Ramesh Mitthapalli) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास संगीता वाघमारे आणि महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात वाद झाले होते. यावेळी संगिता यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली होती. या भांडणाच्या कारणावरुन गायकवाड याचा नातेवाईक अक्षय साठे याने संगिता यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने मारले. यामध्ये गंभीर जखमी होऊन संगीता यांचा मृत्यू झाला. संगीता वाघमारे यांचा मृतदेह तेथील ऊस व बाजरीच्या पिकाच्या बांधावर टाकून दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle) यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास टीलकेकर करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | young man murders a woman in kalas pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News