Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, पुण्याच्या उत्तमनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून सराईत गुन्हेगाराने लहान भावावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) उत्तमनगरमध्ये घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.26) रात्री नऊच्या सुमारास उत्तमनगर (Uttamnagar) येथील मासेआळी समोरील सार्वजनिक रोडवर (Pune Crime) घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक (Criminal arrest) केली असून त्याचे दोन साथिदार फरार झाले आहेत.

अशवेक महेंद्र ननावरे Ashvek Mahendra Nanavare (वय-23 रा. साईधाम बिल्डिंग, मासेआळी, उत्तमनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगार चेतन चव्हाण Chetan Chavan (वय-23) आणि त्याच्या दोन साथिदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चेतनला अटक (Pune Crime) केली आहे. तर त्याचे दोन साथिदार फरार झाले असून पोलीस (Pune Police) त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे असून फिर्यादीच्या मोठ्या भावाचे आरोपीसोबत पूर्वी वाद झाले होते.
फिर्यादी अशवेक हा रविवारी रात्री मासेआळी समोरील बोळातील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी जात होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन आले.
त्यांनी अशवेकला शिवीगाळ केली. तसेच ‘हा पण त्यांच्यातला का’ असे म्हणत आरोपी चव्हाण याने सोबत आणलेल्या कोयत्याने डोक्यात वार केला.
मात्र, फिर्यादी यांनी वार चुकवल्याने हातवर वार लागला. यानंतर आरोपींनी परिसरात मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली.
पुढील तपास उत्तमनगर पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Young man stabbed in old dispute, incident in Uttamnagar, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Politician | कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र; जळगावकरांना बसला आश्चर्याचा धक्का

Pune Police-PMC | पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

Nagpur Crime | काय सांगता ! होय, एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रानं विवाहितेसोबत भलतच ‘कृत्य’