Pune Crime | पुण्यात तरुणाला बेदम मारहण करुन केला हवेत गोळीबार; कोरेगाव पार्कमधील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मराहण यासह अनेक धक्कादायक घटना दररोज पुणे शहरात घडत आहेत. पुण्यातील भरवस्तीत एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना असो किंवा बिल्डरचे अपहरण करुन खून. या घटना ताज्या असतानाच पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये राडा झाल्याची घटना (Pune Crime) समोर आली आहे.

 

या घटनेत पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा झाला. या भांडणामध्ये हवेत गोळीबार देखील करण्यात आला आहे. पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. (Pune Crime)

व्हिडिओमध्ये काही आरोपी एका तरुणाला जबर मारहाण करताना दिसत आहे.
सुरुवातीला ते त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात. त्यानंतर यातील एक आरोपी बंदूक बाहेर काढतो आणि हवेत गोळीबार करतो.
यानंतर सगळे मिळून या तरुणाला बेदम मारहाण करतात.
महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकार भररस्त्यत घडला असून आजूबाजूला अनेक वाहने ये-जा करत असल्याचे दिसत आहे.
गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 

आरोपी सोन्या दोडमणी याने त्याच्याकडील बंदूकीतून हवेत गोळीबार केला.
आरीपींनी तरुणाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सात ते आठ वेळा तोंडावर हाताने मारले.
त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करुन निघून गेले. त्यानंतर काही वेळाने एक आरोपी पुन्हा त्याठिकाणी आला आणि त्याने तरुणावर दगडाने वार केले.
त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन निघून गेले. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Web Title :- Pune Crime | young man was beaten up and fired in the air at koregaon park in pune crime news today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात