Pune Crime | Kiss करण्यास रोखल्याने तरुणी भडकल्या, केअर टेकर महिलेला मारहाण करत तोडले दात; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – दोन तरुणींना आपापसात किस (2 Girl Kissing each other) करताना रोखल्याच्या रागातून एका वयोवृद्ध केअर टेकर महिलेला 4 जणांनी मिळून बेदम मारहाण (Beaten) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. आरोपींनी महिलेला मारहाण करत तिचा दात तोडला. ही घटना पुण्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पुणे शहरातील (Pune) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (sinhagad Road police station) तक्रार दाखल केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना पुण्यातील डी-ॲडिक्शन सेंटरमध्ये (De-addiction Center Pune) चार महिन्यांपूर्वी घडली आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित महिला दाताच्या उपचारासाठी मुंबईला गेली. उपचार करुन पुण्यात परत आल्यानंतर शनिवारी त्यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक करू असे आश्वासन पीडित महिलेला दिले आहे. पीडित महिला या पुण्यातील कृपा फाऊंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या केअर टेकर (Care taker) होत्या.

काय आहे नेमका प्रकार ?

64 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 19 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास व्यसनमुक्ती केंद्रात दोन तरुणी एकमेकांना किस करत होत्या. त्यावेळी पीडित महिला त्या ठिकाणी आल्या. त्यांनी दोन तरुणींना एकमेकांना किस करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिडलेल्या तरुणींनी आणि इतर दोन साथिदारांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. आरोपींनी मारहाण करुन त्यांचा दात तोडला.

त्यानंतर त्या उपचारासाठी मुंबईला गेल्या. मुंबईत उपचार केल्यानंतर चार महिन्यांनी पुण्यात येऊन त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : pune crime | young women beat caretaker after stopping while kissing each other crime in pune

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन,
जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

MP Sudhir Gupta on Amir Khan | आमिर खानवर BJP खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य,
म्हणाले – ‘आजोबाच्या वयात तिसरी पत्नी शोधतोय, हा अंडी विकण्याच्या लायक’