Pune Crime | छेडछाडीची तक्रार केल्याचा राग ! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात घातला हातोडा, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील तळेगावमधील (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात एका 20 वर्षीय तरुणाने हातोडा मारून जीवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी घडली. पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याचा राग मनात धरुन आरोपीने या मुलीवर हातोडीने हल्ला केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, 17 वर्षीय पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी शिवम शेळके (Shivam Shelke) याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी छेडछाड करत असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुला खल्लास करतो’ असं म्हणत तरुणीच्या डोक्यात हातोडा मारला. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी (Seriously injured) झाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, आरोपी शिवम शेळके (Shivam Shelke) हा तळेगाव दाभाडे येथील निवासी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, ”तळेगावात अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरू कडून त्रास, त्या संदर्भात वांरवार पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. पोलिसांनी ना दखल घेतली, ना कारवाई केली. भरदिवसा बाजारात त्याने मुलीच्या डोक्यात हातोडा मारला. दखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असतां, तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा,” अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

Web Title : Pune Crime | youth attacked on minor girl head with hammer in talegaon dabhade of puen district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’