Pune Crime | पोलीस चौकीतील खुर्च्या फेकून देत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्यासोबत हुज्जत घालून पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार पुण्यात (Pune Crime) अनेक ठिकाणी घडत आहेत. वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या तरुणाला पोलीस चौकीत आणल्यानंतर त्याने चौकीतच राडा (Pune Crime) घातला. एवढेच नाहीतर पोलीस चौकी मधील खुर्च्यांची फेकाफेक (throwing chairs) करत पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) शिवीगाळ करुन मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.4) रात्री कात्रज पोलीस चौकीत (Katraj Police Chowki) घडला आहे. या प्रकारानंतर संबंधित तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली.

 

हर्षल बापूराव रोहिले Hershal Bapurao Rohile (वय-21 रा. शरद नगर, चिखली, पुणे) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक विभागातील (Pune Traffic Branch) पोलीस शिपाई गणेश सर्जेराव नरुटे Ganesh Sarjerao Narute (वय-32) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश नरुटे हे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी रात्री ते कात्रज चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना आरोपी हा हॉर्न वाजवून भरधाव वेगात कार चालवताना दिसला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र त्याने गाडी न थांबवता तो तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपीची गाडी थांबवून त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. मात्र, आरोपीने कागदपत्रे न दाखवता तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला बघून घेईन, तू मला ओळखत नाही असे म्हणत वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेला.

 

याप्रकारानंतर पोलिसांनी त्याला कात्रज पोलीस चौकीत आणले असता त्याने चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
तसेच चौकीमधील खुर्चांची फेकाफेक करीत वर्दीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक गौरव देव (PSI Gaurav Dev) यांच्या अंगावर धावून गेला.
त्यांची गचांडी पकडून त्यांना हाताने मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा आणला.
तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | youth beat Sub-Inspector of Police in katraj police Chowki, a disturbing incident in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ghulam Nabi Azad | नवीन पक्ष स्थापन करणार का? गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टच सांगितलं…

Pune Blind Men’s Association | ‘पुणे अंध जन मंडला’चा ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार 2021’ने गौरव

Women Safety Hub | अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका, महिलांच्या सुरक्षेसाठी Facebook ने आणलं ‘हे’ नवं फिचर