Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी 3 सावकारांचा तगादा, युवकानं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाच्या पैशांसाठी (Interest Money) तीन सावकारांकडून (Lender) तगादा लावण्यात येत होता. तसेच जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत होते. सावकारांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur Taluka) घडली आहे. ही घटना भरणेवाडी येथे मंगळवारी (दि. 23) दुपारी दोनच्या सुमारास (Pune Crime) घडली आहे.

 

जावेद अब्बास मुलाणी Javed Abbas Mulani (वय – 32) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जावेद याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यामध्ये त्याने तीन सावकारांची नावे लिहिली आहेत. यावरुन पोलिसांनी प्रफुल्ल रघुनाथ देवकाते Prafulla Raghunath Devkate (रा. पिंपळी, ता. बारामती), विजय मोटे Vijay Mote (रा. निरावागज, ता. बारामती), संदीप अरुण भोसले Sandeep Arun Bhosale (रा. निमसाखरता, इंदापूर) यांच्या विरोधात व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार (Maharashtra Lending Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी नवाज अब्बास मुलाणी (वय – 40 रा. भरणेवाडी) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुलाणी याने गुन्हा दाखल केलेल्या तीन सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते.
सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. याशिवाय जावेदला जीवे मारण्याची धमकी देत होते.
त्यामुळे या सावकारांच्या त्रासाला वैतागून जावेद याने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जंक्शन ते कळस रस्त्यावरील पत्र्याचे शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी जावेद याने चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती. या चिठ्ठीत तीन सावकारांची नावे लिहिली आहेत.
तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे (PSI Atul Khandare) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | youth commits suicide as private money lenders harasses him incident of indapur taluka of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा