Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच तरुणाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला (PMRDA Fire Brigade) मिळाली. अग्निशन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तरुणाचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा झाडावरुन खाली घेऊन पोलिसांच्या (Pune Crime) ताब्यात दिला. हा तरुण गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता (Missing Youth) होता.

 

सोमनाथ दिलीप मोरे Somnath Dilip More (वय-27 रा. इंदिरानगर, लोणी काळभोर) असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सोमनाथ हा गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) दिली होती. पोलीस आणि त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. याच दरम्यान एका तरुणाने झाडाला गळफास घेतल्याची माहिती पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन दलाला सायंकाळी सातच्या सुमारास मिळाली. (Pune Crime)

 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान इंदिरानगर येथे पोहचले. मात्र, ज्या ठिकाणी तरुणाने आत्महत्या केली होती. ते ठिकाणी मुख्य रस्त्यापासून बरेच आत होते. त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखल आणि ओढ्याला पाणी आल्याने जवानांना घटनास्थळी पोहचण्यास अडचणी येत होत्या. मात्र जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत घटनास्थळी जाऊन 25 फुटावरुन मृतदेह खाली उतरवला. जवानांनी स्लायडर, सिलिंग हुक, रोप, कुऱ्हाड याच्या सहाय्याने सर्च लाईटच्या उजेडात हा मृतदेह खाली घेतला.

मृतदेह खाली घेतल्यानंतर जवानांनी मृतदेह ओढा ओलांडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन (Officer Vijay Mahajan) व त्यांचे सहकारी संदीप शेळके,
नितीन माने, मयूर गोसावी, अभिजित दरोड, चेतन खमसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

Web Title :- Pune Crime | Youth commits suicide by hanging, missing for 8 days; Incidents in Loni Kalbhor area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | …शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देताना यावर्षीच दिरंगाई का? सुनिल प्रभूंनी केले हे वक्तव्य

 

Pune Crime | मोठ्या भावानेच केला लहान भावाचा गळा दाबून खून, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

 

Devendra Fadnavis | ‘नाना पटोलेंना असे झटके येत असतात, त्यामुळे ते…’, मोदींवरच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)