Pune Crime | धक्कादायक! लोन अ‍ॅपवरील बदनामीमुळे तरुणाची आत्महत्या; विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोन अ‍ॅपवरील कर्जाची (Loan App) रक्कम भरण्यासाठी नातीने आजीचा खून (Murder) केल्याचा प्रकार नुकताच समोर होता. हे प्रकरण ताजे असतानाच एका तरुणाने लोन अ‍ॅपवरुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दिल्या जाणार्‍या धमकी (Threats) व बदनामीला कंटाळून आत्महत्या केल्याचे (Committed Suicide) निष्पन्न झाले (Pune Crime) आहे.

सोहेल शेख Sohail Shaikh (वय 25, रा. संजय पार्क, विमाननगर) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडिल जावेद अब्दुल शेख Javed Abdul Shaikh (वय 48) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना 8 ऑगस्ट ते 5 सप्टेबर दरम्यान घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल शेख याने लोन अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले होते.
या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्या मोबाईलवर फोन येत होते. फोन करणारे शिवीगाळ करुन धमक्या देत होते.
त्यांची बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली जात होते. या त्रासाला कंटाळून सोहेल शेख याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद करुन तपास सुरु केला. तपासात सोहेल याने लोन अ‍ॅपच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Crime | Youth commits suicide due to defamation on loan app; incident in viman nagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Rural Police | डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा पुण्यात मृत्यू, दहा दिवसांचे बाळ झालं पोरकं

Police Personnel Suspended | …म्हणून पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Sanjay Raut On Shivsena Dasara Melava | “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…” दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी