Pune Crime | दुर्देवी ! ड्रेनेजचे काम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील (Nanded City Campus) ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम करत असताना एका युवकाचा मृत्यु (Died) झाल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. परशुराम रंगप्पा मंगेरी (Parashuram Rangappa Mangeri) (वय, 24 रा. गोखलेनगर वडारवाडी) असं या युवकाचे नाव असून त्याचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

 

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी परशुराम मंगेरी हा नांदेड सिटी येथील डेस्टिनेशन मॉल (Destination Mall) समोरील साईटवर काम करण्यासाठी आला होता. ड्रेनेजसाठी रस्ता खोदायीचे काम सुरू होते, सदर खोदकाम करत असताना परशुराम पाईपची लेव्हल तपासण्यासाठी 16 फूट खोल खड्ड्यात उतरला असता वरून अचानक डांबरी रस्त्याचा भाग आणि माती अंगावर पडून तो त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या जेसीबी आणि पोकलेन, आणि अग्निशमन दलाच्या मदतीने जवळपास 1 तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पण, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. (Pune Crime)

दरम्यान, पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशामक केंद्राचे सुजित पाटील (Sujit Patil), वाहनचालक अभिषेक गोणे (Abhishek Gone),
फायरमन योगेश मायनाळे (Yogesh Mayanale), अक्षय तांबे (Akshay Tambe), किशोर काळभोर (Kishor Kalbhor),
पंकज माळी (Pankaj Mali), अक्षय काळे (Akshay Kale), ज्ञानेश्वर बुधवंत (Dnyaneshwar Budhwant)
यांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्यानंतर तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठवण्यात आला.
याघटनेचा पुढील तपास हवेली पोलीस ठाणे (Haveli Police Station) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | youth dies after being crushed under a mound of earth while doing drainage work nanded city campus pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | ‘रोहित शर्मा चालू मॅचमध्ये शिव्या देतो आणि ड्रेसिंग रूममध्ये…’; मुंबई इंडिअन्समधील स्टार खेळाडूने केला धक्कादायक खुलासा!

 

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

 

Punit Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 7 एप्रिलपासून आयोजन; पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या 18 संघांचा समावेश !