Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खडकवासला धरणातील (Khadakwasla Dam) पंप हाऊसजवळ पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.7) संध्याकाळी घडली आहे. उंचावर जाऊन पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ (Jumping Video) बनवत असताना ही घटना (Pune Crime) घडली. आशिष सुभाष फुरंगे (Ashish Subhash Furange) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

आशिष फुरंगे (वय-18 रा.कर्वेनगर) हा शनिवारी सायंकाळी दोन मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी (Swimming) गेला होता. पाण्यात उडी मारण्याचा व्हिडीओ काढण्यासाठी तो पंप हाऊसच्या कठड्यावर चढला त्यावेळी त्याचा मित्र व्हिडिओ काढत होता. त्याने पाण्यात उडी मारली मात्र तो वर आला नाही. त्यामुळे त्याच्या इतर मित्रांनी आरडाओरडा करुन लोकांना मदतीसाठी बोलावले. (Pune Crime)

 

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) विलास बांबळे (Vilas Bamble), प्रवीण ताकवले (Pravin Takwale) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच नांदेड सिटी अग्निशमन दलाला (Nanded City Fire Brigade) पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आशिषचा शोध घेऊन त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. उडी मारताना पाण्यात डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | youth drown in khadakwasla dam after jumping from pump house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा