Pune Crime | पुण्याच्या हडपसरमध्ये उसने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे भर दिवसा अपहरण; गुन्हे शाखेकडून 4 तासात पर्दाफाश, 5 जण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उसने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी काही गुंडांनी (Pune Criminals) हडपसर (Hadapsar) येथून तरुणाचे अपहरण करुन त्याला कारमधून घेऊन जात होते. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने त्यांचा माग काढत अवघ्या ४ तासात या तरुणाची सुटका करुन पाच गुंडाना जेरबंद केले. (Pune Crime)

 

दीपक मोहन ताकतोडे (वय ३२, रा. मु.पो. अरण, भिमनगर, ता. माढा, जि. सोलापूर), छगन विठ्ठल जगदाळे (वय ३३, रा. मु.पो. अरण, संत सावतामाळी मंदिराजवळ, ता. माढा, जि. सोलापूर), भगवान दत्तु शिंदे (वय ४८, रा. मु.पो. अरण, शिंदेमळा, ता. माढा, जि. सोलापूर), विशाल नानासाहेब सावंत (वय २५, रा. अरण, पाटीलवस्ती, ता. माढा, जि. सोलापुर), विजय सिध्देश्वर शितोळे (वय २७, रा. मु.पो. अरण, खंडोबा मंदिराजवळ, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

यातील भगावान शिंदे याच्यावर २०१० मध्ये खूनाच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) त्याची पॅरोलवर (Paroll) सुटका करण्यात आली होती. पॅरोलवर सुटला असताना त्याने हा गुन्हा केला आहे.

 

 

याबाबतची माहिती अशी, आतिक तांबोळी (वय ३०) हा पूर्वी सोलापूर (Solapur) येथे रहात होता. त्यावेळी त्याने छगन जगदाळे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते त्याने परत केले नव्हते. त्याला पुण्यात एका बँकेत कंत्राटी स्वरुपात काम मिळाले होते. त्यासाठी तो पुण्यात येऊन राहू लागला होता. रविवारी सकाळी तो व त्याचा साडु यासीन शेख हे लग्नाला चालले होते. त्यावेळी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते शेवाळवाडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले. तेव्हा यासीन हा बाजूला उतरुन थांबला होता. त्यावेळी कारमधून काही जण आले व त्यांनी आतिक तांबोळी याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून घेऊन गेले.

 

यासीन याने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. त्याबरोबर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare) व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तांबोळी यांच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते नाना पेठेत (Nana Peth) आढळून आले. पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. यासीन शेख याने तांबोळीचे ज्या गाडीतून अपहरण केले होते, त्याचा नंबर घेतला होता. पोलिसांना ही गाडी एका ठिकाणी सापडली. पोलिसांनी गाडीतील पाच जणांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अपहरण केल्याचा (Kidnapping Case) गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे.

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोंम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, हवालदार प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, दया शेगर, रमेश साबळे, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Youth kidnapped in Pune’s Hadapsar for recovery of money borrowed; Pune Police Crime Branch exposes in 4 hours, 5 arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Modi Visit To Pune | चर्चा तर होणारच! PM मोदींच्या कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले एकाच व्यासपीठावर

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

Amol Kolhe | राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, अजित पवारांनी ते काम केलं – अमोल कोल्हे