Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात भरदिवसा CNG पंपावर तरुणांचा राडा; कर्मचाऱ्याला केली मारहाण (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नऱ्हे परिसरातील (Narhe Area) एका पंपावरील कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. सीएनजी पंपामुळे (CNG Pump) वाहतूक कोंडी होत असल्याचा राग मनात धरून काही युवकांकडून थेट पंपावरील कर्मचाऱ्यालाच मारहाण करण्यात आली आहे. तसेच पंपावर दगडफेक केली आहे. हा प्रकार आज (शनिवारी) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला.

 

नऱ्हे परिसरातील युवांश गॅस स्टेशन (Yuvansh Gas Station) या पंपावर सीएनजी भरण्यासाठी दररोज वाहनांची गर्दी असते. त्यामुळे परिसरात रोजच वाहतूक कोंडी होतेय. याच वाहतूक कोंडीवरून एका युवकाने तेथील कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांच्या दोघांत वाद निर्माण झाला. त्यानंतर त्या युवकाने आणखी 8 ते 10 जणांना बोलावून कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्याच्या कानाला जखम झाली आहे. (Pune Crime)

दरम्यान, भरदिवसा तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराबाबत माहिती समजताच सिंहगड रस्ता पोलीस (Sinhagad Road Police) घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण घटनेचे सीसीटिव्ही फुटेज (CCTV Footage) तपासत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | youth rally at cng pump in narhe pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा