Pune Crime | धक्कादायक ! पुण्यामध्ये बलात्काराचे चित्रिकरण, शुटिंग ! मित्राकडून शरीरसुखाची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्रिणीसोबत (Girlfriend) जबरदस्तीने शरिरसंबंध (Physical Relationship) ठेवल्यानंतर त्याचे मित्राकडून चित्रीकरण (Shooting) केले. यानंतर ते व्हिडीओ इतर दोन मित्रांना पाठवले. त्या दोन मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार कोढव्यातील आश्रफनगर (Ashraf Nagar Kondhwa) परिसरात ऑगस्ट 2021 ते 14 जून 2022 या कालावधीत घडला. याप्रकरणी पाच जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 376, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत एका 20 वर्षाच्या पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुणीचा मित्र, त्याची आई – बहिण व मित्राचे इतर दोन मित्र अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अश्रफनगर येथील एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचे एका दुसऱ्या मित्राच्या मार्फत चित्रीकरण केले. काही दिवसांनी हे चित्रीकरण इतर दोन मित्रांना पाठवले. त्या दोन मित्रांनी व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी (Threat) देऊन पीडित तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली.

 

हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने मित्राच्या आईची भेट घेऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांनी व त्यांच्या मुलीने तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
तसेच आरोपीच्या मोठ्या बहिणीने तरुणीला, ‘जास्त नाटक केलीस तर तुझे व्हिडिओ आहेत, ते आम्ही व्हायरल करु’ अशी धमकी दिली.
यानंतर तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मचाले (PSI Machale) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | youth raped girlfriend five booked video recording of rape demand of romance kondhwa police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा