Pune Crime | पेट्रोल चोरीचा आरोप केल्याने तरुणावर कोयत्याने वार; चौघांविरुद्ध FIR

पुणे : Pune Crime | पेट्रोल चोरीचा आरोप केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) चौघा जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अविराज शिंदे (Aviraj Shinde), आदी आणि दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याप्रकरणी फिरोज जमालउद्दीन शेख Firoz Jamaluddin Shaikh (वय २७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०५७/२२) दिली आहे. हा प्रकार भाग्योदयनगर येथील रॉयल कोर्ट खान बिल्डिंगच्या बाहेर शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी अविराज शिंदे याच्यावर पेट्रोल चोरीचा आरोप लावला होता. फिर्यादी हे मध्यरात्री आपली दुचाकी सोसायटीच्या बाहेर पार्क करीत होते. त्यावेळी अविराज शिंदे याने “मेरे पे झुटा इल्जाम लगाता है क्या, देख तेरे को अभी खत्म कर डालता हू,” असे म्हणून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. तसेच इतर आरोपींनी मिळून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी हे पळून जात असताना आरोपींनी दगड फेकून मारुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर (Assistant Police Inspector Usgaonkar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Youth stabbed for allegedly stealing petrol; FIR against four

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shanikrupa Heartcare Centre | बायपासला करा बाय बाय… शनिकृपा हार्टकेअरच्या प्रव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी प्रोग्राममध्ये भाग घेऊन व्हा दिर्घायुषी

Maharashtra Police Recruitment | बेरोजगारांसाठी खुशखबर! राज्यात 18 हजार जागांसाठी लवकरच पोलीस भरती, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला