Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

पुणे : Pune Crime | लग्न झाल्यापासून वेगळे राहण्यासाठी आणि बाहेर नोकरी करावयाची या कारणावरुन पत्नी आणि सासुच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यामध्ये ‘‘मी माझे जीवाचे बरे वाईट करीत असून त्यास जबाबदार माझी पत्नी व सासु आहे,’’ असे त्यात म्हटले (Pune Crime) आहे.

रोहित सुनिल पवार Rohit Sunil Pawar (रा. माई हाईटस, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १०  ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती. याप्रकरणी सुनिल रघुनाथ पवार (वय ५८, रा. माई हाईटस, लोणी स्टेशन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहित पवार याची पत्नी  रश्मी रोहित पवार (वय २६) आणि सासु लता राजेश चव्हाण (वय ४६, दोघी रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि रश्मी यांचा २० नोव्हेंबर २०१६ रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून वेगळे राहण्याचे कारणावरुन रश्मी रोहितशी भांडणे करत होती. तसेच बाहेर नोकरी करावयाची आहे, म्हणून व घरातील कोणाशीच बोलायचे नाही, या कारणावरुन पत्नी व सासु यांनी त्याला शिवीगाळ करुन सतत भांडणे करुन त्याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रोहित याने १०  ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता. त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आढळून आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शेंडगे अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

Hasan Mushrif | ‘…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले’

ICAI CA Result 2021 | सीए परीक्षेचा निकाल जाहीर, देशात नंदिनी अगरवाल पहिली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | youth suicide due to wife and mother in law in loni kalbhor area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update