Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 10 % व्याज आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून युवकाची आत्महत्या, ‘दोस्त’ आला गोत्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी मित्राकडून घेतलेले 5 लाख रुपये आणि दरमहिन्याला द्यावे लागणारे 10 टक्के प्रमाणे व्याज आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून एका युवकाने आत्महत्या (suicide) केली. हा धक्कादयक प्रकार पुण्यातील (Pune Crime) पिसोळी येथे घडला आहे. याप्रकरणी मयत युवकाच्या पत्नीने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa police) तक्रार केली असून 10 टक्के व्याज घेणाऱ्या मित्रावर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

सचिन सुरेश काळभोर Sachin Suresh Kalbhor (वय-40 रा. पिसोळी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी सुहास ननावरे Suhas Nanavare (रा. धायरी) याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत सचिन याची पत्नी कामिनी सचिन काळभोर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
सचिन याने 5 ऑगस्ट 2020 मध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सचिन याने काही वर्षापूर्वी फ्लॅट घेतला होता.
फ्लॅटचे शेवटचे हप्ते भरुन कर्ज कमी करण्यासाठी त्याने त्याचा मित्र सचिन याच्याकडून 10 टक्के दराने पाच लाख रुपये घेतले होते. व्याजापोटी सचिन दर महिन्याला सुहासला 50 हजार रुपये देत होता.
त्यामुळे सचिनची आर्थिक ताणाताण होत होती.
काही दिवसांनी सुहाने सचिनकडे मुद्दलाचे पाच लाख रुपये मागितले.
पैशांसाठी त्याने सचिनकडे तगादा लावला होता.

 

मुद्दलाच्या पैशासाठी आरोपी सुहास हा शिविगाळ करत होता.
त्याच्या सततच्या त्रासाला वैतागून सचिनने त्याला फ्लॅट नावावर करुन देतो असे सांगितले.
मात्र, सुहाने पैशांची मागणी केली.
तसेच पैसे दिले नाहीतर तुझ्या बायका-पोरांना रस्त्यावर आणेन अशी धमकी दिली.
त्यामुळे सचिन हा मानसिक तणावात (mental stress) होता.
याच तणावातून सचिन याने राहत्या घरात 5 ऑगस्ट 2020 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | youth suicide in kondhwa, FIR on his friend

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shripad Chhindam Arrest | शिवरायांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदमला भावासह अटक, जाणून घ्या प्रकरण

Defective Number Plate Fine | अलर्ट ! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर भरावा लागेल मोठा दंड, जाणून घ्या

Maharashtra ATS | मुंबईत एकही दशतवादी आला नाही, राज्यात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत – एटीएस प्रमुख विनित अग्रवाल