Pune Crime | पुण्यात पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) पांडवनगर (Pandavanagar) येथे सोमवारी (24) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे. आरोपींनी तरुणावर वार करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi Police Station) 5 जणांना अटक (Arrest) केली आहे.

सलीम जावेद शेख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय चंद्रकांत विटकर (वय-19), मयूर सुनिल विटकर (वय-21), अतुल अनिल धोत्रे (वय-23), सागर विनायक मंगळवेढेकर, प्रणव अर्जुन झडपे (वय22 सर्व रा. वडारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. साहील विटकर आणि आकाश ओरसे हे फरार आहेत. याबाबत अली जावेद शेख (वय-23 रा. मजाळकर चौकाजवळ, वडारवाडी, पुणे) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार (API Sandeep Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय विटकर आणि जखमी सलीम यांच्यामध्ये पूर्वी भांडण (Dispute) झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री फिर्यादी यांचा भाऊ सलीम व त्याचे मित्र शुभम दुबळे, मानव शेलार हे उत्तरादेवी जिमच्या (Uttaradevi Gym) समोर शेकोटी करुन गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी विजय विटकर हा आपल्या साथिदारांसह त्याठिकाणी आला.

विजय विटकर याने सलीमला ‘तुला लय माज आला आहे, तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याचा शर्ट पकडून शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच इतर साथिदारांनी लोखंडी रॉड व बांबुने मारहाण (Beating) केली. सलीम याचे मित्र शुभम आणि मानव हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच ‘आमच्या भांडणात पडला तर कोणालाच जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी (Threat) दिली. त्यानंतर आरोपी परिसरात दहशत निर्माण करुन जोरजोरात ओरडत निघून गेले. या घटनेत सलीम शेख हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

Web Title : Pune Crime | youth was attacked with a scythe, 5 people were arrested in pune chaturshringi Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या