Pune Crime | पुण्यात लग्नाच्या वरातीतल्या भांडणातून युवकाचा खून, मृतदेह फेकला कालव्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाच्या वरातीत (Wedding) दारु पिऊन भांडण (Dispute) केल्याच्या वादातून एका युवकाचा खून (Youth Murder) केल्याची घटना पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील (Khed Taluka) कडधे (Kadhe) गावात घडली आहे. युवकाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह (Dead Body) चासकमान कालव्यात (Chaskaman Canal) फेकून दिला. शंकर शांताराम नाईकडे Shankar Shantaram Naikade (वय-40 रा. कडधे, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत मयत शंकर याची पत्नी सुषमा शंकर नाईकडे (Sushma Shankar Naikade) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वासुदेव बोंबले (Vasudev Bombale), पवन बोंबले (Pawan Bombale) (दोघे रा. वेताळे, ता. खेड), स्वप्नील सावंत (Swapnil Sawant), निलेश नाईकडे (Nilesh Naikade), ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे (Rishikesh alias Lakhan Naikade), विलास परसुडे Vilas Parsude (सर्व रा. कडधे, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कडधे गावात मंगळवारी (दि. 24) रात्री घडली.(Pune Crime)

पोलीस निरीक्षक सतीश गुरव (Police Inspector Satish Gurav) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
खेड तालुक्यातील कडधे या गावात मंगळवारी रात्री लग्नाची वरात सुरु होती.
या वरातीमध्ये शंकर नाईकडे आला व त्याने वरातीमधील युवकांकडे दारुची मागणी केली.
यानंतर वरातीत नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करु लागला.
यावरुन बाचाबाची होऊन भांडण झाले. सहा जणांनी त्याला बाजूला अंधारात घेऊन गेले.
त्याठिकाणी त्याला दगड, विटांनी डोक्यात मारहाण (Beating) केली.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शंकरचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह एका वाहनात घालून
चासकमान धरणाच्या (Chaskaman Dam) डाव्या पाण्यात फेकून दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Youth was killed and his body dumped in chaskaman canal khed police station of pune rural police crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा