Pune Crime | वाढदिवस साजरा करायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वाढदिवस साजरा (Birthday Celebration) करण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा (College Youth) 20 ते 25 जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.6) रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात (Pune Crime) खळबळ उडाली आहे. प्रणव उर्फ जय मांडेकर Pranav alias Jay Mandekar (वय-19) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रणव इंद्रायणी कॉलेजमध्ये (Indrayani College) एफ.वाय बी.कॉमचे (FY B.Com) शिक्षण घेत होता. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी (Talegaon Dabhade Police Station) 8 जणांना ताब्यात घेतले आहे. प्रणव हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता. रात्री साडे नऊच्या सुमारास त्याच्या आईने त्याला फोन केला तेव्हा त्याने जेवण झाल्याचे सांगितले. प्रणवसह नऊ जण इदगाह मैदान कडोलकर कॉलनी येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्या दिशेने 20-25 जणांचे टोळके येताना दिसले. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागले. तेव्हा टोळ्याने त्यांचा पाठलाग करुन हल्ला केला. यामध्ये प्रणवचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद काल उमटले. (Pune Crime)

दीड तास उलटला तरी प्रणव घरी का आला नाही म्हणून त्याच्या आईने फोन केला असता तो फोन
तळेगाव पोलिसांनी उचलला आणि घटनेची माहिती आईला दिली.
पोलीस ठाण्यात गेल्यानंतर समजले की, प्रणवच्या सोबत असलेल्या विशालचे मंगेश सोबत फोनवर बाचाबाची
झाली होती, यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा आणि कॉलेजमधील
काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अद्याप या घटनेचे मूळ कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | youth who went to celebrate birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

Pune Crime | मोफत साड्यांचा मोह 2 ज्येष्ठ महिलांना पडला महागात; सिंहगड रोड आणि पाषाण परिसरातील घटना

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन