खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराच्या चाहत्यांनी येरवडा कारागृहाबाहेर केली गर्दी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यासारख्या शांत शहरात खुलेआम गुन्हेगारी तर होऊ लागली आहेच, पण या सर्वांत पोलिसांची दहशत सोडाच, त्यांना कोणी भीत असेल असेही चित्र नसल्याचे दिसू लागले आहे. गुन्हे होत आहेतच, परंतु त्याहुन भयंकर म्हणजे हेच गुन्हेगार कारागृहातून थाटामाटात अन् चाहत्यांनी आखलेल्या प्लनिंगने वाजत-गाजत बाहेर पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे पुणे आता गुन्हेगारीने बरबटले आहे म्हणावे लागत आहे. कारण, आज एका गाजलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कारागृहातून बाहेर येत असल्याने त्यांच्या जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांनी येरवडा कारागृहाबाहेर तुफान गर्दी करून त्याच्या स्वागताची जयत तयारी केल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

येरवडा भागात खळबळ उडवून देणाऱ्या संदीप उर्फ आण्णा देवकर (49) खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार जावेद सय्यद बुधवारी कारागृहातुन जामिनावर बाहेर येत आहे. या गुन्ह्यात 5 जणांना अटक केली आहे. त्यात चौघांनी प्रत्यक्षात संदीप यांचा निर्घृण खून केला होता. चौघे सध्या येरवडा कारागृहात आहेत. तर, भादवी कलम 120 ब नुसार जावेद याला येरवडा पोलिसांनी अटक केली होती. तो साधारण एकच वर्ष कारागृहात राहिला आहे. आज तो जामिनावर बाहेर पडत आहे. त्याचा आंनद त्याच्या चाहत्याला झाला नाही तर गुन्हेगारीतल ते नवलच नव्हे… मग काय या चाहत्यांनी आपल्या भाईच जंगी स्वागत करण्यासाठी कारागृहाच्या बाहेरच तोबा गर्दी केली आहे. त्याचं थाटामाटात स्वागत करून त्याला कारागृहाच्या बाहेर आता पाऊल ठेवण्याची तजबीज करण्यात आली आहे. यातून गुन्हेगारांचे मनोबल आणि पोलिसांची दहशत पाहायला मिळत आहे.

एकीकडे गुन्हे शाखेला आलेली मरगळ पोलीस दलातच चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातल्या गुन्हेगारीबाबत खडान खडा माहिती असायची. पण आता माहिती सोडाच पण खुलेआम सुरू असणारी गुन्हेगारीची माहिती पोलिसांपर्यंत पोहचत नसल्याचे वास्तव आहे. त्याला काही प्रमाणात पोलीस दलातील राजकारण, अविश्वास आणि एकमेकांमधील आकस अशीही कारणे आहेत.

पण या सर्वात शहरातील गुन्हेगारी वाढू लागली असून ते शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा असणार आहे. आणि याकडे पोलिसांनी चौकट सोडून काम करावे लागणार आहे. तरच काही बदल होऊ शकणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर समर्थक कारागृहाबाहेर उभा असल्याचे मॅसेज व्हायरल झाल्यानंतर येरवडा पोलिसांना अखेर जाग आली. यानंतर येरवडा पोलिसांनी कारागृहा बाहेर धाव घेतली. त्यावेळी सय्यद याचे 200 ते 250 कार्यकर्ते याठिकाणी जमले असल्याचे दिसले. त्यांनतर पोलिसांनी कारागृह प्रवेशद्वार पोस्ट ऑफिसकडे हे कार्यकर्ते पाठविले. तेथून येरवडा पोलिसांनी एअरपोर्ट रोडला कार्यकर्त्यांना आणले. तरीही कार्यकर्ते जात नव्हते. मात्र पोलिसांच्या रेट्यामुळे कार्यकर्ते पांगले गेले. यामुळे मात्र पुढील धोका सध्या तरी टळला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –