दत्तवाडी सराईत गुन्हेगाराकडून ‘राडा’, वाहनांची ‘तोडफोड’ अन् ‘दहशत’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – जनता वसाहतीमधील टोळीयुद्धातून झालेल्या खूनानंतर आता कुठे शांतता प्रस्तापित करत असणारा दत्तवाडी परिसर पुन्हा एखदा सराईतांनी फिल्मी स्टाईल अचानक केलेल्या राड्यामुळे ढवळून निघाला आहे. केवळ दोघांनीच दहशतीसाठी वाहनांची तोडफोड करत तुफान राडा घातला. यात सात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
अभिषेक ऐनपुरे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दीनेश उणेचा ( वय 39, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा सराईत गुन्हेगार आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तो एका अल्पवयीन मुलासह मद्यपान करुन दत्तवाडीतील शिवालय सोसायटीसमोर आला. त्यानंतर त्याने हातातील कोयत्याने परिसरातील सात मोटारींची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील वातावरण तणावपुर्ण झाले होते. माहिती मिळताच दत्तवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन एकाला ताब्यात घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.

You might also like