Pune : हडपसर परिसरात मेडिकल दुकानदारास मारहाण करून लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेडिकल दुकान बंदकरून जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी चालत्या दुचाकीवर विटा फेकून मारत खाली पाडून दुकानदाराला लुटल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी आदेश वणवे (वय 21) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेडिकल दुकान आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते दुकान वड करून लक्ष्मीनगर कॉलनी येथून त्यांच्या दुचाकीवर भेकराईनगर येथे घरी जात होते. यावेळी भरधाव दुचाकीवर पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांना विटा फेकून मारल्या. यामुळे ते घाबरले. तरीही ते गाडी चालवत होते. मात्र, काही अंतर पाठलाग केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना चालत्या गाडीवर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यात ते खाली पडले. यानंतर चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांची सोन्याची चैन हिसकामारुन चोरून नेली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माने हे करत आहेत.