रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या तरुणाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडी मशीन चौकात रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धमकावून लुटल्याची घटना घडली. त्याच्याकडील मोबाईल व सोन्याचे लॉकेट काढून चोरटे पसार झाले.

याप्रकरणी बसंतलाल प्रजापती (वय 22, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसंतलाल कात्रज परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेनऊ वाजता कामावरुन सुटल्यानंतर ते खडीमशीन चौकात रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी धमकावून बसंतलाल यांचा मोबाईल, सोन्याचे लॉकेट, रोख रक्कम मिळून 35 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like