Pune : सराईत गुन्हेगारांची नंग्या तलवारी घेऊन दहशत, तरूणावर केले सपासप वार, विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सराईत गुन्हेगारांनी विमाननगर येथे हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर सपासप वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी तुषार बनसोडे, महेश बलभीम सरोदे, आकाश घोडेस्वार, करण भरत सोनवने यांना अटक करण्यात आली आहे. तर यात विशाल कापसे (वय-21) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश, आकाश आणि करण हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा करणं तुजारे व आरोपीमध्ये वाद झाले होते. हे वाद फिर्यादी याने मिटवले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता.
दरम्यान, काल रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी हे विमाननगर परिसरात हातात नंग्या तलवारी घेऊन आले. त्यांनी फिर्यादी याच्याकडून पाहून “हा पण होता का रे”, म्हणत लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी तलवारीने त्याच्यावर वार करत परिसरात दहशत माजवली. कोणी मध्ये आल्यास त्याला ठार करू असे म्हणत तुफान गोंधळ घातला. त्यानंतर आरोपी येथून पसार झाले. काही वेळाने हा प्रकार पोलीसाना समजला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

You might also like