Pune : संतप्त ग्राहकांची ठिकठिकाणी ‘Vodafone-Idea’ च्या स्टोअर बाहेर गर्दी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोबाईल कंपन्यांच्या मागील शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नाही. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन ‘व्ही’ ही कंपनी स्थापन केली. पण मध्यरात्री पावसात ‘ व्ही’ ची यंत्रणा कोलमडून पडल्याने लाखो ग्राहकांना त्याचा फटका बसला.

संतप्त ग्राहकांनी ठिकठिकाणी व्ही च्या स्टोअर बाहेर गर्दी केल्याने कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.