पुण्यात कस्टमकडून 2 कोटी रूपयांचा 868 KG गांजा अन् 7.5 किलो चरस जप्त, प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्याच्या सीमा शुल्क विभागाने (कस्टम) आज दणकेबाज कारवाई करत तब्बल पावणे नऊशे किलो गांजा आणि साडे सात किलो चरस पकडला आहे. दोन्हींची अंदाजे किंमत पावणे दोन कोटींहून अधिक आहे, असे सांगण्यात आले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कस्टम विभागाला दोन दुचाकीवर चौघेजण अमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कस्टमच्या पथकाने याची माहिती काढली. त्यावेळी हा प्रकार घरा असल्याचे समोर आले. यानंतर वेगवेगळ्या टीम करून कस्टम विभागाने चौघांना त्यांच्या दोन दुचाकींसोबत पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कस्टम विभागाला 2 कोटी 4 हजाराहून अधिक 868 किलो गांजा मिळाला.

तर त साडे सात किलो चरस मिळाले असून, त्याची किंमत अंदाजे 75 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. चौकशी सुरू असून, या कारवाईने जिल्ह्यासह पुण्यात मोठी खळबळ माजली आहे. यापूर्वी देखील सीमा शुल्क विभागाने शहरात आणि जिल्ह्यात दणकेबाज कारवाई केल्या आहेत. यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची वरिष्ठांनी चांगलीच झाडाझडती घेतली होती. आता देखील इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असताना पोलिसांना यातले काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.