Pune : कस्टममधील अधिकारी आणि शहरात एसके (SK) नावाने प्रसिध्द असलेले सतीश कुलकर्णी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्कमधील अधिकारी आणि पुणे शहर आणि जिल्हयात एसके म्हणून नावलैकिक मिळवणारे सतीश कुलकर्णी यांचे आज (रविवारी) निधन झाले आहे. त्यांना कोरोना झाला होता. दत्तवाडी परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सन 1990 मध्ये रूजू झालेल्या सतीश कुलकर्णी यांचे शिक्षण सर परशुराम महाविद्यालयातून झाले होते. पुण्याच्या कस्टम आयुक्तालयात आणि संपुर्ण पुणे शहर आणि जिल्हयात सतीश कुलकर्णी यांना एसके या टोपण नावाने ओळखले जात होते. शहरातील अनेक पोलिस अधिकार्‍यांशी त्यांचे अतिशय जिवाळयाचे आणि घनिष्ठ संबंध होते. सतीश कुलकर्णी यांना त्यांनी केलेल्या कस्टम डिपार्टमेंटमधील सेवेसाठी राष्ट्रपती पदक देखील मिळाले होते. त्यावेळी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरात अनेक ठिकाणी झळकले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सतीश कुलकर्णी यांची पुणे पोलिस आयुक्तातील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांशी अतिशय चांगली ओळख होती. एसके यांना अलिकडेच कोरोना झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे आज (रविवार) उपचारादरम्यान दत्तवाडी परिसरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले आहे. महाविद्यालयीन काळात सतीश कुलकर्णी हे बॉक्सिंग चॅम्पियन होते.