Pune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर पोलिसांकडून गुजरातमधील दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Cyber Crime | विविध आजारांचे निदान करणार्‍या माय लॅब (Mylab) या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करत नवीन बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे खोटी सेल्स ऑर्डर तयार करून लोकांची फसवणूक (Cheating) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरात (Gujrat) येथील दोघांना अटक (Pune Cyber Crime) केली.

संस्कार संस्कृत उर्फ रुषी Sanskar Sanskrit aka Rushi (वय १९) आणि प्रशांत सिंग ऊर्फ गुट्टू Prashant Singh alias Guttu (वय २४, दोघेही रा. जामनगर, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर भावेश पासवान (Bhavesh Paswan) याच्यावर गुन्हा दाखल (Pune Cyber Crime) करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

 

चेतन सोनराज रावळ Chetan Sonraj Rawal (वय ३४, रा. बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १९ जुलै २०२१ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने ही फसवणूक झाली.
आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करून त्या सारखे mylabsales.com हे नवीन डोमेन तयार केले.
त्यानंतर फिर्यादीच्या नावाने [email protected] हा ईमेल तसेच फिर्यादीचे फर्मच्या नावाने लोगो तयार केला. त्यामार्फत बनावट सेल्स ऑर्डर तयार केली.
तसेच आरोपींनी एक बनावट फेसबुक पेज तयार करून त्यामार्फत फिर्यादीची कंपनी ही कोरोनाच्या चाचणी किट प्रॉडक्ट विकणारी असल्याचे भासवून ईमेल, बँक खाती, फोन नंबर द्वारे लोकांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी तयार केलेल्या डोमेनबाबत तपास करण्यासाठी, गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी,
तसेच गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
सायबर पोलिस ठाण्याचे (Pune Cyber Police Station) पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण
(Police Inspector Ankush Chintaman) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Cyber ​​Crime | Cheating citizens by creating fake ‘domains’ of My Lab; Pune cyber police arrest two in Gujarat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | मुलीच्या दाखल्यासाठी आलेल्या आईला करायला लावला मसाज; हेडमास्तर तडकाफडकी निलंबित

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती; म्हणाल्या – ‘महिला सुरक्षेच्या संदर्भात BJP च्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या’

Mumbai Crime | प्रसिद्ध बालरोगतज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या